Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार मित्रांसाठी

 

सांगली समाचार - दि. २७|०२!२०२४

सांगली - सांगली जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विजयसिंह लायन्स नॅब येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे. कोरोना काळापासून आर्थिक अडचणी आणि विविध कारणांनी अनेक पत्रकारांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे डोळे तपासणी होऊनही शस्त्रक्रिया पैशाअभावी किंवा इतर कारणाने रखडल्या आहेत. यापैकीच ११ लोकांच्या शस्त्रक्रिया गेल्यावर्षी आपण डॉ. शरद सावंत यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. गायकवाड यांच्या मदतीने मोफत करून घेतल्या होत्या.

आपल्या कुटुंबात किंवा ओळखीच्या पत्रकाराच्या कुटुंबात जर कोणाची मोफत शस्त्रक्रिया करायची असेल तर खालील पत्रकार बांधवांशी संपर्क साधावा. 

शिवराज काटकर, अविनाश कोळी, जालिंदर हुलवान, बलराज पवार, गणेश कांबळे, नंदू गुरव, प्रवीण शिंदे, तानाजी राजे जाधव, विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, नरेंद्र रानडे, शैलेश पेटकर, कुलदीप देवकुळे, चंद्रकांत गायकवाड, किरण जाधव, किशोर जाधव, महादेव केदार, दरिकांत माळी, महालिंग सरगर आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, के के जाधव.