Sangli Samachar

The Janshakti News

जैन कासार समाजातील विजय अण्णा कासार यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दानचिंतामनी पुरस्कार!




सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

पुणे-वाकड - जीवनामध्ये कुटुंबाची जबाबदारी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. परंतु त्याचबरोबर समाजाचे ॠण फेडण्यासाठी, समाजाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन पुणे-बाणेर येथील जैन कासार समाजातील दानशूर उत्तुंग व्यक्तिमत्व, दिगंबर जैन कासार समाज संस्था (सांगली) चे उपाध्यक्ष व जैन कासार समाचारचे मुख्य संपादक श्री. विजय अण्णा कासार यांनी केले.

कासार कुटुंबिय व अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय दिगंबर जैन कासार समाज संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विजय अण्णा कासार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. कासार बोलत होते.

कार्यक्रमाची सुरूवात पैगंबर जैन कासार महिला मंडळातील भगिनीनी सादर केलेल्या णमोकार महामंत्राने झाली. यानंतर सौ. सरिता कासार, सौ. सुगंधा कासार, सौ. पूजा कासार या विजय अण्णांच्या भगिनींना त्यांचे औक्षण केले.

अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने दिगंबर जैन कासार समाज संस्था सांगलीचे अध्यक्ष श्री. पोपटराव डोर्ले, कार्याध्यक्ष श्री. प्रकाश मांगले, प्रमुख संघटक प्रा सुभाष दगडू, पुणे शाखाध्यक्ष उदय शेंडे यांच्या हस्ते दानचितामनी पुरस्कार आणि शाल, श्रीफळ सन्मान पत्र देण्यात आले.

समाजातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, संस्था यांना पैशाच्या रुपाने दान दिल्यानंतर याचा आनंद त्यांच्या चेह-यावर पहायला मिळतो. ते पाहून मलाही समाधान मिळते. आयुष्यात यापुढेही असेच दान करीत राहीन. असे श्री. विजय अण्णा कासार यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विजय अण्णा कासार, सौ. सरिता कासार, सौ. सुगंधा कासार व सौ. पूजा कासार यांच्या हस्ते समाजामध्ये विधायक, रचनात्मक आणि विकासाचे कामे करणा-या व्यक्ती आणि संस्था, तसेच शिष्यवृत्तीसाठी यांना दहा लाख रू. दान देण्यात आले.

कार्यक्रमासाठी रावसाहेब पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे (सांगली), पोपटराव डोर्ले (सांगली) यांच्यासह विजय अण्णांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन योगेश कासार, नीरज कासार, मोतीलाल वणकुद्रे, अभिजीत मांगलेकर, महावीर मांगलेकर विनोद डोर्ले यांनी केले होते तर सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. सुभाष दगडे यांनी केले.