Sangli Samachar

The Janshakti News

अजित पवारही लावणार काँग्रेसला सुरुंग ? काय आहे दादांचा मास्टर प्लॅन ?

सांगली समाचार  दि. १२|०२|२०२४

मुंबई - काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी काही आमदार हे भाजप, तर काही आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या उजव्या हिंदुत्ववादी भूमिकेला पर्याय म्हणून काँग्रेसचे काही आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्याकडून सातत्याने आपल्या भाषणात धर्मनिरपेक्ष विचारांची कास सोडणार नसून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणार असल्याचे म्हटले जाते.
त्यामुळे भाजपमध्ये थेट जाऊन हिंदुत्ववादी विचारांशी समझोता केला असल्याचा ठपका लावून घेण्यापेक्षा राष्ट्रवादीचा सोयीस्कर पर्याय अवलंबला जात असल्याची चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही आमदार काँग्रेसला हात दाखवणार आहेत.