Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेसमोर काँग्रेसचा घंटा नाद

सांगली समाचार - दि. २७|०२|२०२४

सांगली - सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि आळी मिश्रण पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस तर्फे महापालिकेसमोर घटना आंदोलन करण्यात आले. पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही, तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

सांगलीतील नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे दूषित व अशुद्ध पाण्यामुळे सांगलीतील उपनगरात व शहरातील काही भागात आळी मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला व लहान मुले आजारी पडत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही भागात पाणीच नाही अशी दयनीय अवस्था आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ बंद करून पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणे बाबत आदेश द्यावेत. येत्या आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही, तर नागरिकांचा महापालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलन केले जाईल असे नियोजन आज आयुक्त सुनील पवार यांना देण्यात आले.

आयुक्त सुनील पवार यांनी यावेळी पृथ्वीराज पाटील यांना आश्वासन दिले असून, पृथ्वीराज पाटील यांनी जुनी व कालवाह्य झालेले ५६ एमएलडी प्रकल्प बंद करून, नवीन पुरेशी क्षमता असलेला प्रकल्प सुरू करावा व 70 एमएलडी प्रकल्पाचे क्षमता वाढवावी, जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकावी, टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात, स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रस्थापित योजना शासनाला तातडीने सादर करावी, योजना कोणतीही राबवा पण सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा झाला पाहिजे. अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. शहरातील पाणी पुरवठा मीटर चालू स्थितीत असतानाही अनेक ठिकाणी बंद दाखवण्यात आले आहेत, ते दुरुस्त करणे, नवीन अपार्टमेंटमध्ये अवाजवी घरपट्टी व पाणी पट्टी आकारणी सुरू आहे, ते थांबवावे. टाक्यांची बांधकामे तातडीने पूर्ण करावेत, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी आयुक्त वैभव साबळे, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी चर्चेत भाग घेतला व योजनेची माहिती दिली.

घंटानाद आंदोलनात व निवेदन देताना नगरसेवक करण जामदार, संजय कांबळे, रवींद्र वळवडे, सनी धोत्रे, नेमिनाथ बिरनाळे, अल्ताफ पेंढारी, अजय देशमुख, बिपिन कदम, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, आयुब निशांदर, समीर मुजावर, प्रशांत कांबळे, राजेंद्र कांबळे, संजय मोरे, राहुल जाधव, प्रशांत अहिवळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.