Sangli Samachar

The Janshakti News

मराठा आरक्षणातील टक्का ठरला

 


सांगली समाचार  - दि. १८|०२|२०२४

मुंबई  - येत्या २० तारखेला एकदिवसीय अधिवेशन घेणार असल्याचं सांगितलं होतं. मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणाचा शब्द देत मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षातून होऊ लागली आहे. अशातच मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समजत आहे.

मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला आहे. निवृत्त न्यायमूर्तींची या मसुद्यासाठी मदत घेतली होती. कोर्टात नवा कायदा टिकेल असं तज्ञांचं मत आहे. कुणबी वगळून आता राज्यात ३२ टक्के मराठा समाज असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यभर सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं त्यानंतर सरकारकडे अहवाल पाठवण्यात आलं होतं. त्यामध्ये कुणबी वगळून ३२ टक्के मराठा समाज असल्याची नोंद करण्यात आली आहे. जो नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे तो कॅबिनेटमध्ये ठेवण्यात येईल. या मसुद्याला परवानगी मिळाल्यानंतर वीस तारखेला अधिवेशन बोलावलं आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा नवीन कायदा पारित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मागे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळताना ज्या त्रुटी आणि निरीक्षण सांगितली होतीत त्या नवीन कायद्यामध्ये दूर केल्या गेल्या आहेत. नवीन कायदा कोर्टात टिकेल याचीसुद्धा तयारी सरकारने केली आहे.