yuva MAharashtra तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल तर सावधान! मार्केटमध्ये आलाय नवा फ्रॉड...

तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल तर सावधान! मार्केटमध्ये आलाय नवा फ्रॉड...

 

सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

मुंबई - सध्याचा काळ असा आहे की, कॅश काढण्यासाठी कोणीही बँकेत जात नाही. कारण प्रत्येक गल्लीत, चौकात आणि कार्यालयांमध्ये एटीएम मशीन लावल्या गेल्या आहेत. ज्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडत नाही. लोकांना हा फायदा झाला असला तरीही एटीएम फ्रॉडमध्येही वाढ होत आहे. आज आपण अशाच एका एटीएम फ्रॉडविषयी जाणून घेणार आहोत. जो मार्केटमध्ये नवीन आहे.

एटीएमच्या या फ्रॉडमध्ये तुम्ही एकदा अडकला तर तुमचं संपूर्ण अकाउंट रिकामं होणं अटळ आहे. तुम्हाला या फ्रॉडपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आज आपण याविषयी सविस्तर डिटेल्स जाणून घेणार आहोत. जो जाणून घेतल्यानंतर तुमच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता तुम्ही टाळू शकता.

काय आहे नवीन एटीएम फ्रॉड?

नवीन एटीएम फ्रॉड असा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या एटीएम कार्डसोबतच अकाउंटमध्ये उपलब्ध पैसेही गमावू शकता. खरंतर ज्यावेळी तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, त्याच्या थोड्या वेळ पूर्वीच सायबर ठग एटीएम कार्ड स्कॅन करणाऱ्या जागेवर फेविक्विक लावतात. ज्यामुळे तुमचं एटीएम कार्ड मशीनमध्ये चिटकून जातं. यानंतर तुमच्या एटीएमसोबत फ्रॉड सुरु होतं. तुमचं एटीएम कार्ड मशीनमध्ये चिटकल्यानंतर तुम्ही तो काढण्याचा भरपूर प्रयत्न करता. मात्र तुम्हाला यात यश येणार नाही. मग तुम्ही तिथे दिलेल्या हेल्पलाइन नंबरला कॉन्टॅक्ट करता. तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉल करत असाल तर समजून जा की हिच तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण हा नंबर सायबर ठगांनी हेल्पलाइन नंबरच्या नावाने तिथे सोडलेला असतो. कॉल दरम्यान सायबर ठग हे तुम्हाला पिन मागतील. यानंतर तुम्हाला घरी जाण्यास सांगतील. यासोबतच तुम्हाला उद्या बँकेत जाऊन कार्ड कलेक्ट करण्यासही सांगतील. यानंतर तुम्हाला मोठा चुना लागलेला असेल.

येथे करु शकता कॉल 

तुमचं एटीएम कार्ड कधी मशीनमध्ये अशा प्रकारे अडकलं तर सर्वात आधी 112 वर कॉल करुन पोलिसांना बोलवायला हवं. जे घटनास्थळी पोहोचून बँकेशी संपर्क करुन तुमचं कार्ड परत मिळवण्यात तुमची मदत करु शकतील.